वीज मीटर रिडींग चुकीची घेतल्यास फौजदारी गुन्हा : विजय सिंगल

घरगुती,शेती,औद्योगिक,व्यवसायिक अशा प्रत्येक वीज मीटरचे रीडिंग शंभर टक्के अचूक घेतले पाहिजे.चुकीच्या रीडिंग प्रमाणे बिले दिल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होतो. महावितरणच्या  महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही ग्राहकांनी चुकीच्या बिलाबद्दल महावितरणकडे संबंधित एजन्सीची तक्रार केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.त्यावेळी त्यांनी बोलताना असे सांगितले की मीटरचे रीडिंग घेण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ऍप आहे फोटो मीटर रीडिंग साठी संबंधित एजन्सीला चांगला मोबदला दिला जातो तरीही रिडींग न घेता शेरा देणे, फोटो अस्पष्ट घेणे, चुकीचे रीडिंग घेणे हे दिसून आलेच खपवून घेतले जाणार नाही.

एजन्सीच्या विरोधात तक्रार कशी कराल ?

ग्राहकांनी महावितरणकडे लेखी स्वरूपात अथवा मोबाईल ॲप वरून ऑनलाईन तक्रार करू शकता. ग्राहकांसाठी ॲप गुगल प्ले स्टोअर, एप्पल ॲप स्टोअर, विंडोज स्टोअर तसेच महावितरणच्या https://www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.हे ॲप Windows, ios, Android ह्या ऑपरेटिंग सिस्टिम मोबाईल ॲप काम करते.

मोबाईल ॲप वरून तक्रार कशी कराल?

ग्राहकांनी ॲप मोबाईल मध्ये घेतल्यानंतर ॲप ओपन करावे त्यानंतर Don't have account? Sign up यावर क्लिक केलेवर Registration फोर्म ओपन होईल त्यानंतर आपण ग्राहक क्रमांक मोबाईल नंबर ईमेल आयडी🠊Login Name🠊Password🠊confirm Password टाकून Submit बटन वर क्लिक करून Login Name Password विचारेल तो टाका Complaints या बटनावर क्लिक करून ग्राहक क्रमांक निवडून आपण Register New या वर क्लिक करून तक्रार देऊ शकता.

त्यानंतर वीज वितरण कंपनीचे अधिकारी किंवा कर्मचारी संबंधित तक्रारीची शहानिशा करून संबंधित एजन्सीची चुक असल्यास एजन्सीवर फौजदारी गुन्हा दाखल करू शकतात.



 Promoted Content : 

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?

🔴 २०२३ ला व्हिजन ग्रीन काखे करणार : अभिजित सातवेकर...

🔴 फायदेशीर मुक्त संचार गोठा पद्धत.

🔴 जनावरांच्या चारा पिकांचे नियोजन व आहार व्यवस्थापन कसे करावे.















Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post