२०२३ ला व्हिजन ग्रीन काखे करणार : अभिजित सातवेकर...

 

                                                                          

अभिजित सातवेकर 
पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील काखे गावात जय भवानी तालीम मंडळ आहे.त्यातील अभिजीत सातवेकर (राजु) या तरुणाला श्री विठ्ठल कोतेकर सर यांनी सांगितले होते की जग करतय ते करू नका काहीतरी वेगळे करा वेगळे शोधा या प्रेरणेतून अभिजीत दादानां समाजासाठी आणि आपल्या गावासाठी काहीतरी वेगळं करण्याची विचार करत असताना व्हीजन ग्रीन काखे ही संकल्पना सुचली आणि गेले दोन वर्ष झाले गावात ही संकल्पना ते लीलया पेलत आहेत. व्हिजन ग्रीन काखे या संकल्पनेतून एक वाढदिवस एक झाड या उपक्रमातून आत्तापर्यंत 640 झाडे लावून त्यांचे संगोपन आणि संबंधित झाडाचे रेकॉर्ड ठेवून गावातील तरुण एकत्रित करून गावाला  २०२३ ला व्हिजन ग्रीन काखे करणार असल्याचे आमच्याशी बोलताना अभिजित दादांनी सांगितले.हा तरुण प्रत्येक महिन्याला दहा ते पंधरा झाडे लावतो आणि त्याचे संगोपन सुद्धा करतो.म्हणजेच व्हीजन ग्रीन काखे करण्यासाठी हा तरुण अतिशय नाविन्यपूर्ण व सातत्यपूर्ण कार्यक्रम करत असल्याचे दिसून येते.या उपक्रमासाठी गावातील सर्व तरुण मंडळे,सामाजिक कार्यकर्ते,तसेच अभी दादांचे मार्गदर्शन विठ्ठल कोतेकर सर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभते असे ते आवर्जून सांगतात. आपण निसर्गाचे,आपल्या गावाचे कायतर देणे लागतो म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या गावासाठी तरुण वयात चांगले काम करून आपल्या गावाचा नावलौकिक वाढवला पाहिजे.

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post