महाराष्ट्र शासनाने सुपर मार्केट व किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीबाबत चा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पन्हाळा यांचे कडून पन्हाळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पन्हाळा चे धारकरी तहसीलदार पन्हाळा यांना  निवेदन देताना. 

🔴 विनय कोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा स्वप्नील सुनील पाटील सार्वजनिक बांधकाम राज्य सेवा परीक्षेत  राज्यात प्रथम.

पन्हाळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने किराणा मालाच्या दुकानामध्ये व मॉलमध्ये वाईन विक्रीबाबत घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पन्हाळा यांचे कडून मा. तहसीलदार पन्हाळा यांना निवेदन देण्यात आले. किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्रीमुळे देशातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाईल.किराणा दुकान हे पारिवारिक दुकान म्हणून ओळखले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण इथे जात असतो. अशा ठिकाणी वाईनची विक्री झाली तर दारुड्यांना सहजच दारू मिळणार आहे. यातून कित्येक घरे मोडकळीस येतील , कित्येक संसार उद्ध्वस्त होतील, माताभगिनींचे कुंकू पुसले जाईल, लहान मुले आपल्या पालकांचे छत्र हरवतील. तरूण पिढी व्यसनाधीन, व्यभिचारी, चरित्रहिन बनेल, म्हणून वाईन विक्रीचा निर्णय सरकारने बदलावा. यामुळे केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर हिंदुस्थानाची देव,देश,धर्म,राष्ट्र संस्कृती, रूढी-परंपरा धोक्यात येईल. किराणा दुकान आणि माॅलमध्ये वाईनची विक्री करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला खेड्यांपासून शहरापर्यंत प्रचंड विरोध होत आहे.
                                           

व्यसनी मनुष्य सहनशील नसतो. हाती घेतलेले कार्य तो  तडीस नेऊ शकत नाही. स्वतःच्या इंद्रायावर ताबा राखू शकत नाही. व्यसनाचे पदार्थ मिळविण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. यामुळे गुन्हेगारीलाही चालना दिली जाईल. देव,देश,धर्म रक्षणासाठी मन-मनगट-मश्तिष्क मजबूत असणारी निर्व्यसनी, निष्कलंक तरूण पिढी निर्माण करणे आवश्यक आहे. श्री.शिवछत्रपती, श्री.संभाजी महाराजांचा महाराष्ट्र मद्यराष्ट्र होऊ नये. व्यसनाधीन लोकांच्यामुळे स्त्रियांना होणारा मानसिक,शारीरिक त्रास होऊ नये म्हणून माता-भगिनींनीही निवेदनावर स्वाक्षरी करून आपला सहभाग नोंदवून सरकारने घेतलेला निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी केली.

      यावेळी श्रीशिवप्रतिष्ठान पन्हाळाचे धारकरी रोहित पाटील,  प्रविण पाटील, प्रमोद पाटील, स्वरूप मेडसिंग, सौरभ निंबाळकर, विराज कासार, सुदेश जगदाळे, योगेश पाटील, रौनक पाटील व इतर धारकरी उपस्थित होते.

                                                             


Promoted Content :

🔴 शेतकऱ्याला तिप्पट अनुदान देणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना |शरद पवार ग्रामसमृद्धी योजना|

🔴 शेअर मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय ?

🔴 कोल्हापुर मधील पहीला टेक-स्टार्टअप

🔴 विनय कोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा स्वप्नील सुनील पाटील सार्वजनिक बांधकाम राज्य सेवा परीक्षेत  राज्यात प्रथम.



Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post