वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी तज्ञ डॉ.आरती मिलिंद हिरवे./Dr. Arati Milind Hirave. Hirai Hospital Peth vadgaon

वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी तज्ञ डॉ.आरती मिलिंद हिरवे.

प्रसंगावधान समजून घेऊन ठरवलेली ध्येयनिश्चिती, 
त्यास जिद्दीची व बुद्धीची सांगड घातलेली. 
उत्तम आरोग्य हीच असते मनुष्याची खरी धनसंपत्ती, 
समाजातील असंख्य सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या ज्यांनी दूर केल्या अडचणी. 

             अशा कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगांव या शहरातील स्त्री -रोग व प्रसूतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हिराई हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. आरती मिलिंद हिरवे. डॉ. आरती यांनी अल्पावधीतच हातकणंगले तालुक्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. डॉ. आरती यांचे वडील श्री. सदाशिव वाघमारे हे मूळचे कुकटोळी ता. कवठेमहांकाळ येथील रहिवासी होते परंतु, या दुष्काळी भागातील मर्यादित उत्पन्नाच्या साधनांमुळे सांगली येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. वाघमारे दामप्त्यांना दोन कन्या झाल्या. आधुनिक विचारसरणी असल्याने त्यांनी दोन मुलींवर संतती ऑपरेशन केले.श्री.सदाशिव वाघमारे यांनी सांगलीमध्ये कामगार पुरवठा ठेकेदार म्हणून व्यवसायास प्रारंभ केला. या व्यवसायातून येणाऱ्या उत्पन्नातून दोन्ही मुलींना शिक्षण देऊन स्वकर्तृत्ववान बनविले. डॉ. आरती यांच्या करीयर घडविण्यामागे त्यांच्या आई-वडिलांचा खारीचा वाटा आहे.

           सांगली या ठिकाणी जन्माला आलेल्या डॉ. आरती यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली येथील सुंदराबाई दडगे गर्ल्स हायस्कूल येथे घेतले. डॉ. आरती जेव्हा इयत्ता ९वी मध्ये शिक्षण घेत होत्या त्या सुमारास त्यांच्या वडिलांना ह्रदय विकाराचा झटका आला होता परंतु त्यांना तो समजून आला नाही नंतर १२वी परीक्षा सुरू असताना पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांना ह्रदय विकाराचा झटका आला. अशा प्रसंगी त्यांनी त्यांच्या वडिलांची रूग्णालयात सेवा केली व त्याच वेळेस त्यांनी निश्चय केली की, त्यांच्या कुटुंबियांसाठी डॉक्टरच बनायच. १२वी उत्तम गुणांनी त्या उत्तीर्ण झाल्या. पुढील शिक्षणासाठी त्यांनी कोडोली ता. पन्हाळा येथील यशवंत मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊन फस्ट क्लासने पास होऊन पदवी प्राप्त केली.

            पुढे, डॉ. आरती यांचे लग्न माले. ता. पन्हाळा येथील सर्वसामान्य घरातील युवकाशी ठरविण्यात आले. ज्यांचे नाव डॉ. मिलिंद हिरवे असे असून त्यांनीही नुकतेच त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले होते. डॉ. आरती यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की, हा मुलगा भविष्यात उत्कृष्ट कार्य करेल वैद्यकीय क्षेत्रात. ह्या उद्गारांना सत्यात उतरवत डॉ. मिलिंद हिरवे यांनी दोन वर्षातच रूग्णांना बरे करत स्वतः ची ओळख निर्माण करत पेठ वडगांव येथे स्वतः च्या मालकी हक्काचे असे हिराई हॉस्पिटल उभारले. आजपर्यंत डॉ. आरती व डॉ. मिलिंद हिरवे यांनी सुमारे ५० हजाराहून अधिक स्त्री -रूग्णांची तपासणी, हजारो बाळंतपणे, शस्त्रक्रिया या हॉस्पिटलच्या माध्यमातून पार पाडली आहेत. या हॉस्पिटल मध्ये सर्व आधुनिक मशिनरी, उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्त्री रोग निदान, बाळंतपणे, बाळंतपणाची शस्त्रक्रिया आणि उपचार सर्वकाही एकाच छताखाली उपलब्ध असल्या कारणाने हिराई हॉस्पिटल नावारूपास आले. बाळंतपणानंतर स्त्रियांच्या वाढत्या वजनामुळे त्यांचा त्रास कमी करण्यासाठी आहार मार्गदर्शन आणि उपचार करण्याकरीता डॉ. आरती यांनी डाएटीशियनचा वैद्यकीय कोर्स केला आहे. हॉस्पिटल मध्ये अवेळी प्रसूतीसाठी रूग्ण दाखल झाले तरी त्या स्वतः च्या झोपेची चिंता न करता त्या रूग्णांची बाळंतपणे पार पाडतात. 

          डॉ. आरती आणि डॉ. मिलिंद हिरवे यांनी समाजातील सर्व स्तरातील गरजवंताच्या हितासाठी डॉ. मिलिंद हिरवे या फौंडेशन ची स्थापना केली. या फौंडेशन च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे निरनिराळे उपक्रम राबवून सामाजिक कार्यात भर पाडली आहे. असंख्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, मोफत औषधे वाटप, मोफत शस्त्रक्रिया, वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप, हातकणंगले तालुक्यातील सर्व आरोग्य सेविकांच्या कोरोना काळातील त्यांच्या योगदानासाठी त्यांचा सन्मान, गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, फळे व खाऊ वाटप, अल्प भू धारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत, वृक्ष लागवड कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर प्रसंगी महापूर त्रस्त गावात मोफत आरोग्य तपासणी त्याचबरोबर मोफत औषधेही त्यांना देण्यात आली होती. पूर बाधित गावातील नागरिकांना भोजनाची सोय यांसारखी अनेक सामाजिक बांधिलकी जोपासणारी कार्ये ह्या फौंडेशन च्या माध्यमातून त्यांनी केली. 

          कोरोना काळातील भिषण परिस्थितीमध्ये कोरोना बाधित रूग्णांची बाळंतपण डॉ. आरती व मिलिंद हिरवे सुरळीत पार पाडलीत. डॉ. आरती सुनियोजित व्यवस्थापनामुळे हिराई हॉस्पिटल ची दैनंदिन कामे अगदी सहजरीत्या पार पडतात. हॉस्पिटल स्टाफ, आंतररुग्ण विभाग, औषधे विभाग, रूग्णांचे नातेवाईक आणि प्रशासन या सर्वांची भागदौड त्या उत्तमरीत्या सांभाळतात. डॉ. आरती यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे भारत सरकारच्या "स्वच्छ हॉस्पिटल" स्पर्धेत पेठ वडगांव मध्ये हिराई हॉस्पिटलला "प्रथम क्रमांक" लाभला आहे. हॉस्पिटल, रूग्ण, त्यांची सेवा, स्वतः चे कुटुंबीय, नातेवाईक, सन समारंभ आणि इतर अनेक सामाजिक कार्यासाठी तत्पर असणाऱ्या. एका स्त्रीला अवघडलेल्या परिस्थितीतून सहजरीत्या पार पाडत तिला पुनर्जन्म व तिच्या बालकास मातृत्वाचा सहवास लाभवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्या करतात. अष्टपैलू अंगी गुण बाळगणाऱ्या डॉ. आरती हिरवे यांच्या कार्यकर्तृत्वास सलाम.   

                                                                                 धन्यवाद..!


 हे हि वाचा :

➦ गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) / Biography of Dr. Vinay Vilasrao Kore. (savkar)

➦ वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. ||

➦ हरित क्रांतीचे प्रणेते कै.श्री. बापूसाहेब जमदाडे (तात्या)

Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post