रिलायन्स फाउंडेशन आणि पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांनांसाठी वंध्यत्व निवारण व तपासणी शिबीर संपन्न....

 


कोल्हापूर (प्रतिनिधी) : रिलायन्स फाउंडेशन व  पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्यावतीने शेळोशी , ता. गगनबावडा , जि. कोल्हापूर येथे जनावरांचे वंध्यत्व निवारण व तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरामध्ये शेतकऱ्यांच्या गाय व म्हैस या जनावरांच्या काळामध्ये समस्या माजावर न येणे गाबन न राहणे याविषयी तपासणी आणि सोनोग्राफी करण्यात आली व औषध उपचार करण्यात आले तसेच मस्टाटीज या रोगाविषयी तपासणी व उपचार करण्यात आले तसेच या रोगा संबंधित माहिती शेतकऱ्यांना डॉक्टरांच्या कडून पशुपालकांना देण्यात आली जनावरांचा भाकड काळ कमी करण्याविषयी उपचार करण्यात आले या शिबिरामध्ये सुमारे म्हैस , गाय, वासरू व शेळ्या अशा एकूण 260 यांच्यावर वंधत्व निवरणाचे उपचार करण्यात आले तसेच जनावरांना दूध वाढीसाठी आवश्यक कॅलशियमच्या बॉटल मोफत देण्यात आल्या . इतर जनावरांना जंत नाशक औषधे देण्यात आले . 

🔴 फायदेशीर मुक्त संचार गोठा पद्धत. | मुक्त गोठा |

🔴 जनावरांच्या चारा पिकांचे नियोजन व आहार व्यवस्थापन कसे करावे.

         अशा प्रकारे रिलायन्स फाउंडेशन कडून वेळोवेळी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या मदतीने पशुपालकांसाठी व शेतकर्‍यांसाठी शिबीरे घेण्यात येतात. या शिबिरासाठी वैद्यकीय टिम म्हणून डॉ. सॅम लुद्रीक ,डॉ. दीपक तेली,यांनी जनावरांना वंध्यत्व तपासणी व उपचार करण्यात आले. 

तसेच डॉ. सॅम लुद्रीक ,डॉ. दीपक तेली यांनी उन्हाळ्यातील जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन या विषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील, शेळोशी गावामध्ये या वंध्यत्व तपासणी व निवारण शिबिर या शिबिरामद्धे 52 पशुपालक सहभागी झाले होते. व 260 जनावरांना उपचार करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये रिल्यानस फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक मारुती खडके व नवनाथ माने, आणि शेळोशी गावातील पशुपालक उपस्थित होते.



Promoted Content :

🔴 । ऊस शेती | ऊस रोपे लागण करण्याची पद्धत |

🔴 यापुढे सातबारा उतारा होणार बंद भूमी अभिलेख विभागाने घेतला मोठा निर्णय.

🔴 सात-बारा आणि आठ अ उतारा या मधील फरक.

🔴 अल्प भूधारक शेतकरी प्रमाण पत्र कसे काढावे.

🔴 सातबारा उतारा वर झाडे, विहीर, बोअर, नोंद करण्यासाठी अर्ज कसा कराल.

🔴 मिश्र शेती कशी करावी.


















Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post