आता निवेदन / अर्जावर होणार बारा आठवड्यांमध्ये होणार अंतिम निर्णय.



महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १८ जानेवारी २०१३ रोजी शासकीय कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या निवेदनावर/अर्जावर बारा आठवड्यामध्ये कार्यवाही करणेबाबत शासन परिपत्रक काढले आहे.

🔴 फायदेशीर मुक्त संचार गोठा पद्धत. | मुक्त गोठा |

  • शासन परिपत्रकानुसार पुढील सूचना देण्यात आलेल्या आहेत.

१. शासनाकडे आलेल्या निवेदने/अर्जावर शासन परिपत्रक,महसूल व वन विभाग, क्र संकीर्ण०२/२०१० प्र. क्र.२९/अ-२दि.१६/०२/२०१० मधील तरतुदीनुसार बारा आठवड्यात निर्णय घेऊन अंतिम उत्तर देण्यात यावे अपवादात्मक परिस्थितीत त्या प्रकरणी बारा आठवड्याच्या अंतिम उत्तर देणे शक्य नसल्यास अशा परिस्थितीत या प्रकरणाचे अंतिम उत्तर देणे शक्य नाही याचा खुलासा संबंधित आजार असं करण्यात यावा.

२. अशी निवेदने/अर्जाच्या अनुषंगाने अंधाराने न्यायालयात याचिका दाखल केल्यास अशी याचिका दाखल केले पासून ४ आठवड्यात सदर अर्जावर कोणत्याही परिस्थितीत अंतिम निर्णय घेण्यात यावा व अर्जदारास अंतिम उत्तर देण्यात यावे.

३. वरील प्रमाणे कार्यवाही करणेसाठी प्रत्येक कार्यालयात जनतेची निवेदने/अर्जाचा नोंदणी करता स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावे.

४. उक्त नोंदवहीत नोंदवलेल्या निवेदने/अर्जावर कार्यवाही केली जाते किंवा नाही याचा आढावा कार्यालयीन प्रमुख विभाग प्रामुख्याने दरमहा द्यावा.

५. दरम्यान घेतल्या गेलेल्या आढावा चा संक्षिप्त अहवाल प्रत्येक अधिकारी त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सादर करावा उदारता जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे विभागीय प्रमुख आणि विभागाच्या सचिवाकडे देणेत यावा.

६. जनतेची निवेदने अर्जाचा निर्णयाबाबत अधिकारी कर्मचारी हेतू परस्पर दुर्लक्ष करत असेल अगर निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असेल तर अशा अधिकारी-कर्मचारी यांच्याविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.

७. उक्त १ व २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या निवेदन अर्धाच याबाबत कार्यवाही करावयाची आहे त्यामध्ये नोकरी सेवाविषयक पत्रांचा अंतर्भाव करण्यात येऊ नये.

  • वरील मुद्यांचे  सर्व स्तरावरून काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

संबंधित परिपत्रक हव्या असल्यास काय करावे ?

या परिपत्रकाची प्रत आपणास हवे असल्यास शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१३०११८११०२५५१००७ हा आहे. ह्या क्रमांकावर आपणास सामान्य प्रशासन विभागाने शासकीय कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या निवेदनावर बारा आठवड्यांमध्ये कारवाई करणे बाबत जे शासन परिपत्रक काढले आहे ते आपणास प्राप्त होईल.


  सबंधित बातम्या :  












Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post