मा. आर आर पाटील स्मार्ट ग्राम स्पर्धे मध्ये काखे ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक
पन्हाळा (प्रतिनिधी) : मा. आर आर पाटील स्मार्ट ग्राम स्पर्धे मध्ये काखे ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक प्राप्त मा. आर.आर पाटील स्मार्ट ग्राम स्पर्धा २०२०-२०२१ मध्ये पन्हाळा तालुक्यातून एकूण २८ ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये काखे ग्रामपंचायत देखील सहभागी झाली होती. काखे ग्रामपंचायती ने या स्पर्धेसाठीच्या निकषाची तयारी सूक्ष्मपणे केली होती. काखे गावातील ग्रामस्थांनी यासाठी आपले मोलाचे योगदान दिलेले आहे. स्पर्धेच्या निकषानुसार गडहिंग्लज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद मगर, विस्तार अधिकारी (पंचायत) शहाजी घुले, विस्तार अधिकारी (कृषी) सुमित जजेरवार, पाणीपुरवठा उपाभियांता बाबा कराड यांनी सखोल तपासणी करून निकाल जाहीर केला यामध्ये काखे ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक आल्याचे जाहीर केले.
यासाठी पाणी पुरवठा
कर्मचारी श्री. जयसिंग मोरे, क्लार्क श्री शिवाजी पाटील,
अमित पाटील, शिपाई श्री. विठ्ठल मोरे, डेटा ऑपरेटर श्री. अमित तानाजी पाटील, कॅप्टन जे बी
पाटील विधार्थी वसतिगृहाचे सर्व शिक्षक व विध्यार्थी, प्राथमिक
शाळा व माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद व विध्यार्थी, आरोग्य
उपकेंद्राचे सर्व कर्मचारी, गावात्तील सर्व अंगणवाडी सेविका,
मदतनीस, आशा स्वयंसेविका, सर्व तरुण मंडळे, सर्व महिला बचत गट यांचे सहकार्य
लाभले. यासाठी तत्कालीन ग्रामसेवक श्रीमती विद्या सावंत यांचे सहकार्य लाभले,
त्याच बरोबर या तपासणी कामी ग्रामविकास अधिकारी श्री. शिवाजी बापू
पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
मा. आमदार डॉ. विनयरावजी कोरे सावकर यांच्या प्रेरणेतून व मा. दीपक नामदेव पाटील (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश आम्हाला मिळाल. यासाठी सदस्य रामचंद्र पांडुरंग पाटील, दादासो दगडू पाटील, सचिन आनंदा पाटील, प्रकाश सर्जेराव कदम, अक्षया आनंदा जाधव, आशा उत्तम ढोले, सारिका पोपट सातवेकर, लता प्रकाश खुडे, शीतल सुनील दाभाडे, शोभा तानाजी वाघमोडे, यांचे सहकार्य मिळाल्याचे सरपंच दगडू रंगराव पाटील, व उपसरपंच संदीप शामराव पाटील यांनी सांगितले.
🔴 सातबारा आणि आठ अ चा नक्की फायदा काय ? सातबारा आणि आठ अ च्या नोंदी कश्या घालतात.