वारणानगर, येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संपन्न झालेल्या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरण समवेत पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, गजानन कुरणे, सुचित्रा चावरे, आशिष कांबळे, डॉ. प्रीती शिंदे-पाटील, प्रा. यु.डी. कदम. वारणानगर (प्रतिनिधी) : ता. पन्हाळा, वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये
राष्ट्रीय मतदार दिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न
झाला. महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मतदार आणि मतदान जागृकता शपथ घेतली.
प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी शपथ वाचन केले. दरम्यान या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध ऑनलाइन
स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रांगोळी स्पर्धा सुरक्षित
अंतराच्या सर्व नियमांचे पालन करीत ऑफलाइन पद्धतीने तर वक्तृत्व आणि घोषवाक्य लेखन
स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचे १२५ हून
अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. 🔴 वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्तदरम्यान पन्हाळा येथे संपन्न झालेल्या समारंभात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार रमेश शेंडगे, महसूल चे सहाय्यक निवडणूक अधिकारी गजानन कुरणे, श्रीमती सुचित्रा चावरे, आशिष कांबळे आणि पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या हस्ते महाविद्यालयातील 15 हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. "भारत निवडणूक आयोग आणि राष्ट्रीय मतदार जनजागृती अभियानाच्या निमित्ताने अत्यंत कठीण काळात प्रशासनाशी संपर्कात राहून यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवल्या चे पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले."
महाविद्यालयाच्या प्रांगणात जवळपास ४० हून अधिक विद्यार्थीनी मतदान जनजागृती अभियान संदर्भात काढलेल्या रांगोळी प्रदर्शनास जवळपास दोन हजारांहून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी भेट देऊन स्पर्धक विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. "राष्ट्रीय मतदार दिवसाच्या" औचित्याने २७७ शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ ,तहसीलदार कार्यालय पन्हाळा यांच्या वतीने स्पर्धेत मध्ये विजयी झालेले स्पर्धक असे. : रांगोळी स्पर्धा वरिष्ठ गट : प्रथम क्रमांक - सिद्धी मालवणकर, द्वितीय क्रमांक - योगिता परीट, सई इंगळे. तृतीय
क्रमांक - अश्विनी कंठे, रसिका केकरे. उत्तेजनार्थ
क्रमांक - श्रृतिका जोशी, स्नेहल घाटगे, प्राप्ती आरळेकर. रांगोळी
स्पर्धा कनिष्ठ गट : प्रथम क्रमांक - साहिल धोंगडे. द्वितीय
क्रमांक - सानिका पाटील. तृतीय
क्रमांक - सुप्रिया जाधव, व वैष्णवी साळोखे. उत्तेजनार्थ क्रमांक - अनुजा पाटील, दिपाली गोंडे, गणेश गुरव. वक्तृत्व
स्पर्धा वरिष्ठ गट : प्रथम
क्रमांक - संपदा
बच्चे. द्वितीय
क्रमांक - प्रज्ञा गायकवाड, प्रणाली पाटील. तृतीय
क्रमांक - श्रीरंग जकाते. उत्तेजनार्थ क्रमांक - रवींद्र पाटील, अंजली जाधव. वक्तृत्व
स्पर्धा कनिष्ठ गट : प्रथम
क्रमांक - स्वरूपा कुरणे. द्वितीय
क्रमांक - पृथ्वी झोरे, व उदय जाधव. तृतीय
क्रमांक - नीलाक्षी माने. उत्तेजनार्थ क्रमांक - शिवानी सुतार, व सानिका सकटे. घोषवाक्य
स्पर्धा वरिष्ठ गट : प्रथम
क्रमांक - संपदा बच्चे व स्नेहल घाटगे. द्वितीय
क्रमांक - प्रियांका
पाटील. तृतीय क्रमांक - श्वेता घाटगे. उत्तेजनार्थ क्रमांक - हनमंत कुराडे, अश्विनी कंठे, संचिता पाटील. घोषवाक्य
स्पर्धा कनिष्ठ गट : प्रथम क्रमांक - आरती कुंभार. द्वितीय
क्रमांक - सुमैय्या
तांबोळी व निशांत धबाडे. तृतीय क्रमांक - पूजा माळी. उत्तेजनार्थ क्रमांक - संदेश भोई, सानिका सकटे ,मानसी कुंभार. स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचे श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,आ. डॉ. विनयरावजी कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.वासंती रासम यांनी विशेष अभिनंदन केले आहे. प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या स्पर्धांचे पारितोषिक वितरण पन्हाळा तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार मा.श्री रमेश शेंडगेसो यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचा विद्यार्थी उदय जाधव याचा "युथ आयकॉन" म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धांचे आयोजन प्रा. यु. डी. कदम व डॉ. प्रीती पाटील यांनी केले तर परीक्षण डॉ. एस.एस. जाधव, डॉ. आर .बी. पाटील, बी.के. वानोळे, सौ. व्ही.पी. रजपूत, डॉ. पी.एम. पाटील, श्री. एस.एस. लाड, सौ. दिपाली पाटील यांनी केले. Promoted Content : |
Tags:
News