रिलायन्स फाऊंडेशनचा सल्ला तरुण शेतकर्‍यांना ठरत आहे, हक्काचे व मार्गदर्शनाचे ठिकाण… ऊस शेतीमधून मिळविले 45000 रुपये.

रिलायन्स फाऊंडेशनचा सल्ला तरुण शेतकर्‍यांना ठरत आहे, हक्काचे व मार्गदर्शनाचे ठिकाण. ऊस शेतीमधून मिळविले 45000 रुपये.

रिलायन्स फाऊंडेशनचा सल्ला तरुण शेतकर्‍यांना ठरत आहे, हक्काचे व मार्गदर्शनाचे ठिकाण… ऊस शेतीमधून मिळविले 45000 रुपये.
निलेश विलास कुराडे

पन्हाळा ( प्रतिनिधी ) :

          पन्हाळा पश्चिम भागामध्ये ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. प्रत्येक शेतकर्‍याला त्याच्या उदरनिर्वाह करेल येवढी शेती आहे त्यामुळे त्या शेतीत कष्ट करून मर्यादित उत्पन्न घेण्याची परंपरा या विभागात आहे. कु. निलेश विलास कुराडे. कुराडवाडी, ता.- पन्हाळा, जि. – कोल्हपुर येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत आहेत.  कु. निलेश यांची कौटुंबिक परिस्थिति खूप गरिबीची आहे. एकूण क्षेत्र फक्त 12 गुंटे असल्याने शेती करण्याची जुनीच पद्धत होती शेती करताना वडीलोपार्जित शेती असल्यामुळे भात व उस हे मुख्य पीक घेत होते . शेती करताना भात शेती ही पावसाच्या पाण्यावरती व उस पीक कमी प्रमाणात तसेच उस पीक करताना होणारा भरपूर खर्च यामुळे ऊस शेती खूप महागात पडत होती.अशावेळी एक तर जमीन खूप कमी व उत्पादन खर्च खूप यामुळे द्विधा मनस्थितीत असणारे निलेश कुराडे शेती कमी असून सुद्धा उत्पादन कसे सुधारता येईल व उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याचा सल्ला कोठे मिळतो याबाबत माहिती घेत होते. यामध्ये त्यांची भेट रिलायन्स फाऊंडेशन च्या प्रतींनिधी बरोबर झाली यामध्ये त्यांनी रिलायन्स फाऊंडेशन राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती घेतली.

            ऊस शेती करत असताना मशागत करताना शेणखत कंपोस्ट खत हे जमिनी साठी आवश्यक असते याची माहिती नव्हती तसेच जमिनीमध्ये सतत घेतले जाणारे उसाचे पिक त्यामुळे उसाचे उंची कमी व उत्पादनात घट येत होती खत व्यवस्थापन करताना बाजारामध्ये कमी दरात मिळणारे खते शेताला देत होतो ऊस पिकावर ती किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत होता तो रोखण्याचे प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा माहिती नव्हते ऊस पिकाला पाण्याचे नियोजन करण्याची माहिती नव्हते तसेच तन नियंत्रण करण्यासाठी खर्च येत होता खडकाळ जमिनीमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव अशा समस्या मला ऊस शेती करताना येत होते खताची माहिती न मिळणे त्यामुळे उत्पादन खर्च वाढायचा व अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. जमिनीमध्ये बैल जोडीने नांगरणी करणे, अडीच ते तीन फुटची सरी सोडून उसाचे पीक घेणे व यामध्ये मका हे अंतर पीक घेत होतो तसेच मका या पिकमुळे उसाचे उत्पादन कमी मिळत होतो अनियमित खत व्यवस्थापनामुळे उत्पादन खर्च हा जवळ जवळ 12 गुंठयासाठी 6000 रुपये ते 8000 रुपयापर्यंत खर्च येत होता.

            यानंतर रिलायन्स फौंडेशनच्या विविध ऑनलाइन व प्रत्यक्ष  कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली .यानंतर रिलायन्स फौंडेशन च्या १८००-४१९-८८०० या टोल फ्री क्रमांकाची माहिती मिळाली व तिचा  वापर करून उस पिकाबाबत माहिती घेण्याबाबत सुरुवात केली. रिलायन्स फाऊंडेशनच्या संपर्कामध्ये आल्यानंतर ऊस शेती करत नसताना माती परीक्षणाचे महत्व तसेच सेंद्रिय कर्ब किती असावे जमिनीचा सामू किती असावा व जमिनी मध्ये कोणते अन्नद्रव्ये असतात आणि ऊस पिकाला कोणते अन्नद्रव्य आवश्यक असतात याची माहिती मिळाली तसेच खत व्यवस्थापन करताना नत्र स्फुरद पालाश हे माती परीक्षणाच्या नमुने नुसार पिकाला दिले गेले आणि शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी शेणखत आणि गांडूळ खताचा वापर केला त्याचबरोबर निरोगी आणि शुद्ध बियाण्याची निवड करण्याची माहिती मिळाली बीज प्रक्रिया कशी करावी याची माहिती मिळाली आणि रोग व किडीचे नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय कसे करावेत याची माहिती फाऊंडेशनच्या कार्यक्रमांमधून व टोल फ्री नंबर वरून मिळाली. शेतीची मशागत करताना बारा गुंठा साठी दोन गाड्या शेणखत तसेच चार ते साडेचार फुटाची सरी आणि 86032 या बियाण्याची निवड ह्याची माहिती मिळाली तसेच बियाणे वरती बाविस्तीन व क्लोरोपायरीफॉस या बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करण्याची माहिती मिळाली तसेच नत्र स्फुरद पालाश या खतांचा डोस चार हप्त्यांमध्ये देण्याची माहिती मिळाली त्याचबरोबर लोह मॅंगेनीज फॉस्फरस या सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती मिळाली तसेच तांबेरा व करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बाविस्टीन किंवा मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात वापरुन फवारणी ची माहिती मिळाली आणि या माहितीचा वापर केल्यामुळे माझ्या शेतामध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला तसेच फाउंडेशन मधून मिळणाऱ्या माहितीचा वापर शेतीमध्ये केल्यामुळे ऊस शेतीचे उत्पादनात वाढ झाली.

"रिलायन्स फाऊंडेशनचा सल्ला तरुण शेतकर्‍यांना ठरत आहे, हक्काचे व मार्गदर्शनाचे ठिकाण... ऊस शेतीमधून मिळविले 45000 रुपये."










Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post