रिलायन्स फौंडेशन व कृषी महाविद्यालयाकडून जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन..

रिलायन्स फौंडेशन व कृषी महाविद्यालयाकडून जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन.


रिलायन्स फौंडेशन व कृषी महाविद्यालयाकडून जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन...

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशन व विभागीय कृषी विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्यावतीने नावीन्यपूर्ण उपक्रम ५ डिसेंबर हा दिवस जागतिक माती दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जमीन जिवंत ठेवा जैवविविधतेचे रक्षण करा हे ब्रीदवाक्य घेऊन शेतकऱ्यांना जमिनीचा पोत सुधारणीसाठी रिलायंस फाऊंडेशन व विभागीय कृषी विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत जिल्ह्यातील पन्हाळा, कागल तालुक्यातील कागल, वाघवे, बानगे, येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर व्हाट्सएपच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात कागल, वाघवे, बानगे शेतकरी सहभागी झाले होते . कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागीय कृषी विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय कोल्हापूर कृषीविद्यावेत्ता डॉ. अशोकराव पिसाळ सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जमिनीचा पोत सुधरण्यासाठी शेंद्रीय शेतीवर जास्त भर दिला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना शेंद्रीय शेती शक्य नाही अश्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून आपल्या जमिनीला ज्या घटकाची आवश्यकता आहे, तितक्याच प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे. तणनाशक, कीटनाशकांचा बेसुमार वापर टाळला पाहिजे. जमीनीतील सेंद्रीय कर्ब हा जमिनीतील सुपिकतेचा खरा आधार आहे, तो टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. जागतिक मृदा दिनानिमित्त माती परीक्षणाविषयी जागरूक राहून त्यावर आधारित जमीन, आरोग्य पत्रिकेचा वापर करून जमिनीची निगा राखूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनीचे आरोग्य सुधारणा, सुपीकता वाढवणे, क्षारपट जमिनीला उपजाऊ जमीन बनवण्यासाठीचे उपाय तसेच आपल्या प्रश्नांचे निराकरण करून घेतले . कार्यक्रमाचे आयोजन रिलायंस फाऊंडेशनचे राज्य समन्वयक दिपक केकन तसेच जिल्हा व्यवस्थापक मारुती खडके, तर कार्यक्रम सहायक म्हणुन नवनाथ माने यांनी काम केले.



Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post