तुमच्या व्यवसायाला कर्ज मिळत नाही मग ह्या ठिकाणी करा तक्रार...

तुमच्या व्यवसायाला कर्ज मिळत नाही मग ह्या ठिकाणी करा तक्रार...


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लघु उद्योगांना कर्ज पुरवठा व्हावा यासाठी ८ एप्रिल २०१५  रोजी 'मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी' म्हणजे मुद्रा बँक योजनेचे उद्घाटन केले. त्यामध्ये वीस हजार करोड रुपये भांडवलाची तरतूद करण्यात आली

🔰 मुद्रा लोन चा फायदा

⧫ स्वतःचे दहा टक्के भाग भांडवलाची गरज नाही.
⧫ मुद्रा लोन साठी कोणत्याही प्रकारचे मोरगेज ठेवावे लागत नाही.
⧫ मुद्रा लोन साठी जामीनदाराची गरज नाही.

🔰 मुद्रा लोन साठी आवश्यक बाबी

⧫ अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
⧫ अर्जदारास कोणत्याही बँकेच्या थकबाकीदार नसावा.
⧫ मुद्रा लोन साठी सरकारी बँकेत व्यवसायिक खाते असणे आवश्यक आहे.

🔴 ।माहितीचा अधिकार  अधिनियम २००५ ची सविस्तर माहिती।भाग १।

🔰 मुद्रा बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

ओळखीचा पुरावा.
⧫ रहिवासी पुरावा.
⧫ व्यवसायाचा पत्ता व परवाना.
⧫ व्यवसायासाठी लागणारे मटेरियल चे कोटेशन.
⧫ ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला आहे त्यांच्या व्यवसायाचे नाव व पत्ता. 
⧫ अर्जदाराचे दोन फोटो.

🔰 मुद्रा लोन साठी अर्ज कसा करावा.

अर्जदाराने सरकारी बँकेत नवीन व्यवसाय खाते काढून किंवा ज्या सहकारी बँकेमध्ये आपले व्यवसाय खाते आहे त्या ठिकाणी सहकारी बँकेला भेट देऊन अर्ज द्यावा.आपल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती अर्जासोबत द्यावी. बँकेला आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर बँक कर्जास मंजुरी देते. अर्जदारास कर्ज मंजूर झाले नंतर मुद्रांक कार्ड देण्यात येते मुद्रांक कार्ड रुपये कार्ड च्या संयोगाने काम करते व्यवसायासाठी त्या कार्डाचा उपयोग करून आपण वस्तू खरेदी करू शकता म्हणजे या कार्डचा उपयोग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड प्रमाणे करता येतो.

🔴 बँक कर्ज देत नाही मग,ह्या ठिकाणी तक्रार करा.

🔰  मुद्रा योजनेत खालील तीन श्रेणी

⧫ शिशु श्रेणी : शिशु श्रेणी अंतर्गत आपणास व्यवसाय सुरु करण्यासाठी पन्नास हजार रुपयांचे कर्ज  मिळू शकते.

⧫ किशोर श्रेणी : किशोर श्रेणी अंतर्गत आपणास व्यवसाय स्थापन करण्यासाठी पन्नास हजार रुपयांपासून पाच  लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते .

⧫ तरुण श्रेणी : तरुण श्रेणी अंतर्गत आपणास व्यवसाय वाढवण्यासाठी पाच लाख रुपयांपासून   दहा  लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

🔰 आपणास कर्ज न मिळाल्यास तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक.

◆ महाराष्ट्र :- १८००१०२२६३६

◆ नॅशनल :- १८००१८०११११

◆ अतिरिक्त :- १८००११०००१







 Promoted Content : 

🔴 ।माहितीचा अधिकार  अधिनियम २००५ ची सविस्तर माहिती।भाग १।

🔴 भ्रष्ट अधिकारी लाच मागत आहे तर मग अशी करा ऑनलाईन तक्रार 

🔴 रेशनकार्ड वर किती धान्य मिळते,मोबाईल वरून करा चेक आणि योग्य धान्य मिळत नसेल तर अशी तक्रार करा.







Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post