रिलायन्स फाऊंडेशनच्या शेती विषयक ऑनलाइन मार्गदर्शन सेवेमुळे तुकाराम सुपले यांना झाला फायदा, एक एकरात 104 टनापासून मिळाले 3 लाख 12 हजार रुपये...

रिलायन्स फाऊंडेशनच्या शेती विषयक ऑनलाइन मार्गदर्शन सेवेमुळे तुकाराम सुपले यांना झाला फायदा, एक एकरात 104 टनापासून मिळाले 3 लाख 12 हजार रुपये.

कोल्हापुर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील हवामान, जमीन आणि मुबलक पाणी उसासाठी पोषक असल्यामुळे येथील  शेतकरी प्रामुख्याने ऊस शेती करतात.बहुतांशी शेतकरी पारंपरिक पद्धतीने ऊस पीक घेत असतात.मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे भरघोस कसे घ्यावे या विषयी शेतकऱ्यांना योगी वेळी मार्गदर्शन मिळत नाही.परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत म्हणावे तसे ऊसाचे किफायतशीर असे उत्पादन मिळत नाही.परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता.कागल ) येथील शेतकरी श्री .विठ्ठल तुकाराम सुपले या शेतकऱ्यांने रिलायन्स फौंडेशनच्या  ध्वनी संदेशसेवा,ऑडिओ कॉन्फरन्स, व्हाट्सअप ग्रुप, तसेच १८००-४१९-८८०० या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या शेतात उसाचे विक्रमी असे उत्पादन घेतले आहे.रिलायन्स फाऊंडेशनच्या शेती विषयक सेवेमुळे विठ्ठल सुपले यांनी 1 एकरात तब्बल 104 टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे.यामधून त्याना 3,12,000  रुपये मिळाले आहेत.रिलायन्स फाऊंडेशनच्या संपर्कात येण्यापूर्वी एक एकरात फक्त 32 टन ऊसाचे उत्पादन मिळत होते.फक्त 96000 हजार रुपये मिळाले होते. 

             कागल तालुक्यातील खडकेवाडा या गावात श्री .विठ्ठल तुकाराम सुपले हे पत्नी व मुलां सोबत राहतात.त्यांची स्वतः ची 5 एकर शेती आहे.या शेतीत ऊस व सोयाबीन,तंबाखू आदी वार्षिक पिके घेतात. विठ्ठल सुपले ऊस हे प्रमुख पीक घेतात.सुपले यांची शेती करण्याची पद्धत जुनीच आहे.पारंपरिक पद्धतीने ऊस शेती करतात. ऊसाची सरी 3 फुट सोडत होते.ऊस बीज प्रक्रिया करत नव्हते. ऊस लागण करताना दाट ऊस लागण करत दोन रोपात योग्य अंतर ठेवत नव्हते.ऊसामध्ये सरीत तुडुंब भरून पाट पाणी देत होते. सुपले यांचे अनावश्यक असे पाणी नियोजन होते.कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याची माहिती नव्हती.त्यामुळे ते फवारणी करत नव्हते.त्याना उत्पन्न घेताना अडचणी येत होत्या.हवामान माहिती नव्हती.ऊसाची लागण करण्याची पद्धत व बियाणाची निवड कशी करावी हे माहीत नव्हते.हुमणी किडीचे नियंत्रण करता येत नव्हते. खोडवा पिकाचा फुटावा कमी येत होता.युरिया , डी.ए पी. , 24:24:0 रासायनिक खते वापरत होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करत नव्हते.

           एकंदरीत विठ्ठल सुपले यांना ऊस शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान माहिती नव्हते. यामुळे सुपले याना ऊस शेती करताना उत्पादन खर्च व नफा याचा ताळमेळ बसत नव्हता.ऊस शेतीतून फायदा होत नव्हता. ऊस शेती बाबत  विठ्ठल सुपले निराश होते.पुढे 2018 मध्ये विठ्ठल सुपले रिलायन्स फौंडेशनच्या संपर्कात मित्राच्या सांगण्यावरून ऑनलाइनऑडिओ कॉन्फ्रेंस मध्ये सहभागी झाले.त्यानंतर खोडवा पीक व्यवस्थापन, उस खत व्यवस्थापन,उस लागवडी पूर्व नियोजन या विषयावरती रिलायन्स फाउंडेशनच्या कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाले होते. तसेच विठ्ठल सुपले गेली 2 वर्षे रिलायन्सच्या मोफत व्हाईस मेसेज सेवेचा लाभार्थी आहेत.त्यांना हवामानाची माहिती खत व्यवस्थापन व संभाव्य येणाऱ्या किडीची रोगाची माहिती त्याच्यावरती कोणत्या औषधाची फवारणी करावी याची माहिती मिळत होती. यामध्ये शेतीतज्ञ डॉ.अशोकराव पिसाळ यांचे मार्गदर्शन मिळाले.हुमणी किडीचे नियंत्रण करता कसे करावे समजले.रिलायन्सच्या मोफत शेती विषयावर कार्यक्रमामध्ये शेती व्यवसाय फायदेशीर आहे याची माहिती मिळाली.

            विठ्ठल सुपले यांना रिलायन्स फौंडेशनद्वारे उस पिकासाठी मशागत करताना शेणखत व कंपोस्ट खताचा वापर करणे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी उपाय योजना बद्दल माहिती मिळाली. ऊसाच्या सरीतील साडेचार फुट अंतर ठेवून सरी काढली. दोन रोपातील योग्य अंतर ठेवले.हुमणी नियंत्रण करण्यासाठी पंपाला 50 ग्रॅम मेटाराईझम बुरशीचा वापर केला.यामुळे हुमणी नियंत्रण झाले.विठ्ठल सुपले यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या माहितीतून बीज प्रक्रिया करताना जैविक व रासायनिक बिजप्रक्रिया केली.युरिया - सिंगल सुपर फॉस्फेट मेरिटोऑफ पोटॅश तसेच मॅग्नेशिअम, झिंक सल्फेट ,बोरॉन यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्य आदी खतांचा वापर केला.रिलायन्सच्या शेती विषयी माहितीमुळे ऊस पिकाच्या आवश्यकतेनुसार सरी पद्धतीने पाणी दिले.रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उस स्पेशियल ,बोरॉन याची फवारणी घेतली .तसेच करपा किंवा तांबेरा रोगासाठी बावीस्टीन आणि क्लोरोपायरीफोस या कीटक नाशकाची आवश्यकतेनुसार फवारणी केली.विठ्ठल सुपले यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या शेती विषयक विविध सेवेतून माहितीचा उपयोग करून एक एकरात तब्बल 104 टनाचे विक्रमी उत्पादन घेतले. यासाठी त्यांना उत्पादन खर्च- 60000 रुपये प्रती एकरी आला.विठ्ठल सुपले याना प्रति  1 टन 3000 रुपये प्रमाणे3,12,000 रुपये मिळालेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या संपर्कात येण्यापूर्वी उत्पादन खर्च एकरी 40,000हजार रुपये येत होता.एक एकरात फक्त 32 टन ऊस मिळाला होता. प्रति 1 टन 3000 प्रमाणे  96000रुपये मिळाले होते. ऊस उत्पादन खूपच कमी मिळत होते.रिलायन्स फाऊंडेशनच्या ऊस शेती विषयांवर मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल सुपले यांना उसाचे विक्रमी उत्पादन मिळून फायदा झाला आहे.

रिलायन्स फौंडेशनच्या सर्व सेवेचे श्री विठ्ठल सुपले यांनी आभारी मानले आहेत. तसेच  इतर शेतकऱ्यांना व मित्रांना या सेवेचा लाभ घेऊन आपल्या शेतीचे उत्पादन वाढवावे.तसेच रिलायन्स फाउंडेशन सेवेची माहिती सांगत आहेत.



 Promoted Content : 

🛑 तुळस शेती करून मिळवा लाखोंचे उत्पन्न...

🛑 फायदेशीर मुक्त संचार गोठा पद्धत. | मुक्त गोठा पद्धत |

🛑 जनावरांच्या चारा पिकांचे नियोजन व आहार व्यवस्थापन कसे करावे.

🛑 सातबारा वर झाडे, विहिर, बोअर नोंद करण्यासाठी अर्ज कसा कराल.




Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post