शेंडूरच्या विजय डोंगळे यांनी एक एकर ऊस शेती मधून100 टन उत्पादनामधून मिळविले 3 लाख रुपये....डोंगळे यांना रिलायन्स फाऊंडेशनच्या शेती विषयक मार्गदर्शन सेवेमुळे झाला फायदा...

                                                                

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने ऊस शेती करतात.बहुतांशी शेतकरी पारंपरिक पद्धतीने ऊस पीक घेत असतात.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे भरघोस कसे घ्यावे या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना म्हणावे तसे ऊसाचे किफायतशीर असे उत्पादन मिळत नाही.परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता.कागल ) येथील शेतकरी विजय चंद्रकांत डोंगळे या शेतकऱ्यांने रिलायन्स फौंडेशनच्या व्ही. एम. एस .सेवा,ऑडिओ कॉन्फरन्सव्हाट्सअप ग्रुपतसेच १८००-४१९-८८०० या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या शेतात उसाचे भरगोस असे उत्पादन घेतले आहे.रिलायन्स फाऊंडेशनच्या शेती विषयक सेवेमुळे विजय डोंगळे यांनी 1 एकरात 100 टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे.यामधून त्याना 3,00,000 रुपये मिळाले आहेत.रिलायन्स फाऊंडेशनच्या संपर्कात येण्यापूर्वी त्याना एवढे भरगोस उत्पादन मिळत नव्हते.विजय चंद्रकांत डोंगळे हे शेंडूर ता.कागल (जि. कोल्हापूर) या ठिकाणी पत्नीदोन मुले व आईवडिलां सोबत राहतात. विजय यांचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले आहे. शेंदूर या गावात त्यांची स्वतः ची दोन एकर शेती आहे.या शेतीत ऊसभातसोयाबीन आदी वार्षिक पिके घेतातऊस व सोयाबीन हे प्रमुख पीक घेतात.

            विजय डोंगळे यांची शेती करण्याची जुनीच पारंपरिक पद्धत होती. शेती करताना वडीलोपार्जित शेती असल्यामुळे सोयाबीन व उस हे मुख्य पीक घेत होते तसेच उस पिकाचे उत्पादन घेताना बियाणाची निवड करताना किती महिन्याचं उस निवडावा. पूर्वी माती परीक्षण करत नव्हते. बियानावरती बीज प्रक्रिया करत नव्हते. त्यामुळे उस व सोयाबीन पिकावरती कीड व रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत होता. जमिनीची मशागत ही रोटावेटर उभा आडवा नांगरणी करत होते.ऊस शेती करत असताना मशागत करताना शेणखत कंपोस्ट खत हे जमिनीसाठी आवश्यक असते याची माहिती नव्हती त्यामुळे विजय डोंगळे यांची जमीन टणक बनली होती.ऊस पिकाला फुटावा येत नव्हता. उस पिकमध्ये खोड कीड , हुमणीवाळवी , रस शोषणार्‍या आळी , लष्करी आळी तसेच तांबेरा ,करपा या रोगाचे व किडीचे प्रादुर्भाव होत होता. तसेच पिकाला पाणी आवश्यकतेप्रमाणे मिळत नसल्यामुळे ऊसाची वाढ व ऊंची कमी होती. उत्पादन खर्चामध्ये वाढ होत होती तसेच जमिनीमध्ये सतत घेतले जाणारे उसाचे पिक त्यामुळे उसाचे उंची कमी व उत्पादनात घट येत होती.यामुळे विजय डोंगळे यांना ऊस शेती करत असताना फायदा होत नव्हता.

🔴 । ऊस शेती | ऊस रोपे लागण करण्याची पद्धत | Marathi vlog |

विजय डोंगळे हे रिलायन्स फौंडेशनच्या संपर्कात 2018 मध्ये मित्राच्या सांगण्यावरून  रिलायन्स फाउंडेशनच्या डायल आऊट या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.त्यावेळी त्याना रिलायन्स फाउंडेशन कडून तज्ञांच्या मार्फत उस पिकामधील खत व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन व बियाणाची माहिती मिळाली. त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये विजय डोंगळे सहभागी झाले. रिलायन्सच्या टोल फ्री  1800-419-8800 या क्रमांकावरुन  माहिती घेत होते. उस पिकातील अंतर पिकाचे महत्व व सोयाबीन हे पीक अंतर पीक म्हणून घेतले. त्याच बरोबर ध्वनि संदेश सेवेचा  2019 पासून फायदा ते घेत आहेत. या सेवेमुळे विजय यांना हवामानाची माहिती.खत व्यवस्थापन व संभाव्य येणाऱ्या किडीची रोगाची माहिती मिळाली. त्याच्यावरती कोणत्या औषधाची फवारणी करावी याची माहिती डोंगळे यांना मिळत होती. या कार्यक्रमामध्ये शेती व्यवसाय फायदेशीर आहे. याची माहिती मिळाली. तसेच बीज प्रक्रिया ही रासायनिक व जैविक पद्धतीने कशी करावी रासायनिक पद्धतीने बीज प्रक्रिया करताना बुरशिनाशक व कीटक नाशक याची बीज प्रकिया करण्याची पद्धत  जैविक बीज प्रक्रिया करताना रायझोबियम , अप्सरजिलियस , अझ्याटोबक्टर याची बीज प्रक्रिया केली.यामुळे पिकावरती रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी झाला. पिकांच्या मुळाची वाढ चांगली झाली. तसेच खत व्यवस्थापन करताना नत्र स्फुरद ,पालाश या रासायनिक खताबरोबर स्लरी,गोमूत्र,जिवामृत जैविक खाते व सेंद्रिय खते यांचा मिक्स पद्धतीने आलटून पालटून पद्धतीने ठिबक नसल्याने पाट पाण्यातून ड्रमद्वारे उस पिकाला 15 दिवसाच्या अंतराने थोडा थोडा खताचा डोस दिला. 

🔴 मुक्त संचार गोठा पद्धत।शेतीलादुग्ध व्यवसायाची जोड...!

            शेतीची मशागत करताना खोल नांगरटमशागती वेळी एकरी 20 ते 25 गाड्या शेणखत जमिनीमध्ये टाकावे. चार ते साडेचार फुटाची सरी काढावी. 860032 या बियाण्याची निवड करताना 10 ते 11 महिन्याचा ऊसाची निवड व दोन डोळे पद्धतीने उस लागवड करावी. तसेच नत्र स्फुरद पालाश या खतांचा डोस चार हप्त्यांमध्ये देण्याची डोंगळे यांना माहिती मिळाली. त्याचबरोबर लोह मॅंगेनीज फॉस्फरस या सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती मिळाली. उस पिकाला आवश्यकतेनुसार पाणी द्यावे हे समजले. उन्हाळ्यात 10 दिवसाच्या अंतराने व हिवाळ्यात 15 दिवसांनी सरी पद्धतीने पाणी द्यावे याची माहिती मिळाली.  हुमणीचे नियंत्रण करण्यासाठी मेटाराईजम बुरशीचा वापर पंपाला 50 ग्रॅम घेऊन दोन आळवणी डोंगळे यांनी केल्या. त्यामुळे पिकमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झाला नाही.स्लरीजिवामृत , जैविक- अझॅटोबॅक्टर,पीएसबीपोटॅश मेमोराईझर. व सेंद्रिय खतेताग , ढेंच्या यासारखी हिरवळीची खतेयुरिया , 10:26:26 खतांचा वापर केला. पिकाच्या आवश्यकतेनुसार सरी पद्धतीने पाणी दिले. उन्हाळ्यात 10 दिवसाच्या अंतराने व हिवाळ्यात 15 दिवसाच्या अंतराने पाट पद्धतीने पाणी दिले.डोंगळे यांनी 19:19:19 , बोरॉन, 6बीएजिब्रालिक असिड याची फवारणी घेतली. तसेच करपा किंवा तांबेरा रोगासाठी बावीस्टीन आणि क्लोरोपायरीफोस या कीटक नाशकाची आवश्यकतेनुसार फवारणी केली.

🔴 मिश्र शेती कशी करावी.

रिलायन्स फौंडेशनकडून  माहिती मिळाल्यानंतर होणारा उत्पादनाचा खर्च 35,000 हजार रुपये आला. पूर्वीचा उत्पादन खर्च  55000रुपये येत होता. रिलायन्सच्या कृषी सेवेमुळे उत्पादन खर्चात20,000 रुपयेची बचत झाली. विजय डोंगळे हे शेतकरी रिलायन्सच्या संपर्कात येण्यापूर्वी मागील वर्षाचे उत्पादन  42 टन झाले होते.या पासून विजय डोंगळे यांना  1,26,000 रुपये मिळाले होते. सरासरी उत्पादन  प्रती गुंठा 1 टन मिळत होते. विजय डोंगळे रिलायन्स फाऊंडेशनच्या संपर्कात आल्यानंतर या वर्षात उत्पादन 100 टन  मिळाले.प्रति टन 3000 हजार रुपये प्रमाणे त्याना  3,00,000 रुपये मिळाले.सरासरी उत्पादन प्रती गुंठा2.5 टन मिळाले.

विजय डोंगळे यांनी रिलायन्स फौंडेशनच्या सर्व सेवेचे आभार मानले आहेत. ते इतर शेतकऱ्यांना या सेवेचा लाभ घेऊन आपले शेतीचे उत्पादन वाढवावे. ते मित्रानाही रिलायन्स फाउंडेशन सेवेची माहिती सांगत आहेत.












Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post