कोडोलीतील तरुणाने वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना वह्या वाटप व अल्पोहार ची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकी जोपासली.
कोडोली
: कोल्हापूर
जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव असणारा परिसर आहे. अशा
पुरोगामी विचारांच्या भूमीमध्ये प्रशांत बाजीराव पाटील या तरुणाने युवकांसमोर एक
नवा आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण समाजाचे काही तरी देणे
लागतो ही उद्दात भूमिका डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासत या तरुणाने
शुभेच्छा आणि भेटवस्तूच्या संस्कृतीला बाजूला सारून वारणा परिसरातील काही तरुणांना
घेऊन ऐतिहासिक शिवछत्रपतींच्या पावन झालेल्या किल्ले पन्हाळा गडावरील श्री
दिलीपसिंह राजे घाडगे बालग्राम पन्हाळा येथे मुलांना वह्या वाटप व त्यांच्या अल्पोहाराची
व्यवस्था केली अशा वाढदिवसाच्या उपक्रमाचे खरंच कौतुक करावे तेवढे थोडे आहे कारण
तरुण श्रीमंती दाखवण्याच्या नादात हजार रुपये खर्च करतात परंतु प्रशांत पाटील
यांनी सामाजिक बांधिलकीतून अनाथाश्रमातील वंचित उपेक्षित असे जीवन जगणाऱ्या
मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले या कौतुकास्पद वाढदिवसाचे कौतुक होत आहे, या
तरुणाने सामाजिक भान जपण्याची प्रेरणा तरुणांच्या समोर ठेवली आहे.