कोल्हापूर येथे परिवर्तनवादी साहित्यिक मा. दादासाहेब तांदळे यांच्या 'चऱ्हाट - अ बॅड पॅच' या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते संपन्न...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपण पाहिलेलं स्वप्न आणि ठरवलेलं ध्येय कसं साध्य करावं याविषयी माहिती करून देणारं दादासाहेब तांदळे लिखित ‘ चऱ्हाट - अ बॅड पॅच ’ या पुस्तकाचे प्रकाशन आज झाले. या प्रसंगी रयत शिक्षण संस्था आणि इतर संस्थांमधुन सेवानिवृत्त झालेल्या सर्व शिक्षक - शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आज अखेर जीवन व्यतित केलेला ६० वर्षाचा जीवन प्रवास दादासाहेब तांदळे यांनी 'चऱ्हाट - अ बॅड पॅच' या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडला आहे. हे आत्मचरित्र निश्चितच तरुणांना दिशादर्शक व मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी केले...
मा. न्यायमुर्ती जी. डी. इनामदार (पुणे), मा. प्रा. चंदकुमार नलगे - जेष्ठ साहित्यिक कोल्हापूर, प्रा. डॉ. जयवंत व्हटकर - माजी कुलसचिव सोलापुर विद्यापीठ, मा. प्रा. आर. डी. गायकवाड - माजी सचिव रयत शिक्षण संस्था, मा. विशाल लोढे - सहा. आयुक्त सामाजिक न्या. विभाग, मा. जयंत पाटील - अध्यक्ष आखिल भारतीय सरपंच परिषद, प्रा. पी. जी. साठे - मा. संचालक विज्ञान परिषद, प्रा. डॉ. शरद गायकवाड - प्रसिद्ध वक्ते, महावीर विद्यालय, प्रा. डॉ. संभाजी बिगंजे - सदस्य डॉ. आंबेडकर चरित्र साधने मा. प्रा. शिवाजीराव मोरे (आप्पा) - सदस्य जि. प. कोल्हापूर यांनी प्रास्ताविक केले...