कोण आहेत अ‍ॅडव्होकेट विजयसिंह पाटील (उत्रेकर)

राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे पन्हाळा तालुका विकास सेवा संस्था गटाचे  अधिकृत उमेदवार अ‍ॅडव्होकेट विजयसिंह पाटील (उत्रेकर) कोण आहेत ?


      वाघवे येथील ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, वाघवे या संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट विजयसिंह पाटील (उत्रेकर) कार्यरत असून संस्थेमार्फत त्यांनी  वाघवे येथे ज्युनिअर कॉलेज, यवलूज येथे सिनिअर कॉलेज व मोरोशी, ता.राजापूर, जि. रत्नागिरी येथे माध्यमिक विद्यालयाची स्थापना करून संस्थेमार्फत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. दि कोडोली अर्बन को-ऑप. बँक लि. कोडोली या बँकेच्या व्हाईस चेअरमन पदी व सलग दहा वर्षे संचालक म्हणून काम केलेले असलेमुळे त्यांना सहकारामधील बँकींगबाबत पूर्ण अनुभव आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. 

        विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून व वैयक्तिक रूपाने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी एकमेव बँक आहे. संस्था सक्षम झाल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास होणार नाही. अपात्र कर्जमाफी संदर्भात ते सातत्याने गेली दहा वर्षे आंदोलन व कायदेशीर लढ्यासाठी प्रयत्नशील होते. याबाबत त्यांनी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवलेला होता. त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे याचिका दाखल केली होती. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर ऊस दराबाबत आंदोलन करत असताना त्यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे देखील दाखल झाले होते. 


        कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध झाला आहे. राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी मार्फत अ‍ॅड.विजयसिंह पाटील (उत्रेकर) यांना पन्हाळा तालुका विकास सेवा संस्था गटातून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. मा.आमदार सत्यजीत पाटील, मा.आमदार चंद्रदीप नरकेअरुण नरकेबाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली ते निवडणूक लढवित आहेत. त्यांचे वडील स्वर्गीय वाय.डी. पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमनव्हाईस चेअरमन व संचालक म्हणून प्रामाणिकपणे काम पहिले होते. त्यांच्या काळामध्ये त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांनी तालुक्यातील अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरीच्या संधी दिल्या आहेत. त्यांच्याच कार्याचा वसा व वारसा अ‍ॅड.विजयसिंह पाटील (उत्रेकर) प्रामाणिकपणे पुढे चालवत आहेत.

आमच्याशी बोलताना अ‍ॅड.विजयसिंह पाटील (उत्रेकर) यांनी असे सांगितले की, मी खात्री देतो की, सर्व विकास सेवा संस्था व त्यांचे सभासदांचे संरक्षण करण्याचे जबाबदारी घेणेची वेळ आलेली आहे. त्यामध्ये कोणतीही कसूर करणार नाही.



 Promoted Content 


















Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post