पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील काखे गावातील संकल्पना काखे गावातील सर्व तरुण मुलांनी आपले गाव हिरवे करण्यासाठी व पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी व्हिजन ग्रीन संकल्पना चालू करून 2025 पर्यत 2025 झाडे वृक्षारोपण करण्याचे ध्येय ठेवले आहे. यामध्येच मुलगी सासरी जाताना झाड लावून जाण्याची प्रथा चालु केली आहे. चि सौ कां स्नेहल शिवाजी आरळेकर हिने महादेव मंदिर परिसरात आंबा हे झाड वृक्षारोपन केले.
उपस्थित गावातील शिवाजी आरळेकर स्वजिक आरळेकर, अनिकेत आरळेकर संजीव आरळेकर, प्रथमेश आरळेकर, दत्तात्रय आरळेकर, ऋतुला पाटील, नारायण पाटील व अभिजीत सातवेकर होते.
Tags:
News