रिलायन्स फाऊंडेशनची माहिती पशुपालकांसाठी नवसंजीवनी...
रिलायन्स फाऊंडेशनची माहिती पशुपालकांसाठी नवसंजीवनी- पशुपालन यशस्वी करण्यात मोठा सहभाग पशुपालक हरिहर तुकाराम जगताप यांना जनावरांच्या आरोग्य शिबिराचा व टोल फ्री नंबरचा झाला मोठा फायदा.
सातारा जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी शेती बरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोडोली येथे हरिहर तुकाराम जगताप कुटुंबासह राहतात.ते शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. पण हा व्यवसाय करत असताना शेतकरी पारंपरिक पद्धतीने म्हणजे जुन्या पद्धतीने करतात.त्यामुळे त्याना कष्टाच्या तुलनेत किफायतशीर नफा मिळत नाही.परंतु रिलायन्स फाऊंडेशनच्या 'जनावरांच्या आरोग्य ' शिबीरमधून व टोल फ्रि क्रमांक 1800-419-8800 वरून मिळाल्याल्या माहिती मुळे दूध उत्पादन वाढून त्याना जनावरांच्या दुधात वाढ झाली आहे.
त्यांच्याकडे दोन गायी, एक कालवड , एक म्हैस असे एकूण 4 जनावरे आहेत आहे.शिक्षण कमी असल्यामुळे हरिहरजगताप हा दुग्ध व्यवसाय पारंपरिक पद्धतीने करत होते.त्यामुळे त्यांना जनावरांची योग्य ती माहिती मिळत नव्हती, जनावरांची निवड, जनावरांचे आजार ,जनावरांचा जनावरांचा दूध देण्याचा कालावधी,दुधाचा दर्जा ,दुधाला मिळणारा दर यामध्ये वैरण व पशुखाद्याच्या वरील होणारा जास्तीचा खर्च यांचा ताळमेळ बसत नव्हता पशुपालन व्यवसाय यातून उत्पन्न खूप कमी मिळत होते . तसेच जनावरांना कोणत्या ऋतू मध्ये कोणता रोग येतो तसेच कोणत्या प्रकारचे लसीकरण केले पाहिजे याची सुद्धा माहिती उपलब्ध होत नव्हते.हा व्यवसाय करत असताना ते निराश होते.
शेतकऱ्यांची जनावरांच्या आरोग्य विषयाची गरज ओळखून रिलायन्स फाऊंडेशनने रिलायन्स फाऊंडेशनच्यारिलायन्स फाऊंडेशन डे दिवसानिमित्त कोडोली गावांमध्ये 31/12/2019 रोजी जनावरांचे आरोग्य शिबिर घेतले होते. पशुपालक हरिहर जगताप यांना व इतर शेतकऱ्यांना या शिबिरात डॉ,.दिनकर बेडरे, व डॉ.कांबळे यांनी सर्व पशु पालकांना योग्य ते मार्गदर्शन केले. त्यामध्ये जनावरांची खरेदी करताना घ्यावयाची काळजी. जनावरांचे आहाराचे महत्व,ओला चारा ,सुका चारा,जनावरांच्या दुधातच्या काळात किती सकस आहार दिला पाहिजे. त्यामध्ये खाद्य किती किलो ,सरकी पेंड, मिनरल मिक्स्चर याच्या प्रमाण दूध देणाऱ्या गाईला मिनरल मिक्श्चर हे रोज 50 ग्रॅम द्यायला पाहिजे , महिन्यातून एकदा कॅल्शियम यांच्याबरोबर जनावरे गाभण असण्याची लहान लक्षणे कोणती असतात. त्यानंतर आजारावरील घरगुती उपचार प्रथम उपचार कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
हरिहर जगताप यांना या शिबिरांमधून मिळालेल्या माहितीचा पुरेपूर उपयोग घेतला.जनावरांची निवड जनावरांचे आजार ,जनावरांचा जनावरांचा दूध देण्याचा कालावधी,दुधाचा दर्जा ,दुधाला मिळणारा दर यामध्ये वैरण व पशुखाद्याच्या वरील होणारा जास्तीचा खर्च यांचा ताळमेळ याची सविस्तर माहिती मिळाली.यामुळे हरिहर यांना दूध व्यवसायात योग्य वेळेत चांगले नियोजन करता आले. त्यांना त्याचा खूप मोठा फायदा झाला.त्यांच्या रोज मिळणाऱ्या दुधात वाढ झाली.रिलायन्सफाऊंडेशन च्या शिबिरापूर्वी एक गाय त्यांची सरासरी 8 ते 9लिटर दूध देत होती.तीच गाईचे योग्य खाद्य व चारा देण्यामुळे दुधात वाढ झाली. तिची दूध देण्याची क्षमता 11 ते 13 लिटर पर्यंत जाऊन पोहोचली. योग्य प्रमाणात सर्व दिल्यामुळे त्या गायीच्या दुधाच्या फॅटमध्ये पण वाढ चांगली झाली,. एकूण उत्पादन खर्च कमी झाला उत्पादन वाढले. एकूण नफा वाढला आहे.पूर्वी एकूण सरासरी अगोदर 27 ते 30 पये दर मिळत होता.तो 34 ते 36 रुपये देणे मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांचे होणारे आर्थिक नुकसान कमी झाले.होणारा फायदा वाढला आहे. त्यांच्या उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दूध व्यवसायामधून पहिले त्यांना दर दहा दिवसाला 2700 रुपये मिळत होते.ते आता 4680 रुपये मिळू लागले. त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुद्धा मोठा बदल होत असल्याचे हरिहर जगताप यांनी सांगितले आहे .त्यामुळे रिलायन्स फाऊंडेशन घेतलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमामुळे माझ्या गाईच्या दुधात वाढ झाली व गाईंचे आरोग्य चांगले राहिले यासाठी हरिहर जगताप रिलायन्स फाउंडेशनचे आभार मानले. तरी अशीच माहिती आम्हाला इथून पुढे काय मिळावी हीच त्यांची अपेक्षा आहे.हरिहर जगताप रिलायन्स फाउंडेशनच्या टोल फ्री क्रमांकचा टोल फ्री क्रमांक 1800-419-8800 चा वापर करत आहेत. आवश्यक ती माहिती मिळवत आहेत.
Tags:
News