रिलायंस फाउंडेशनचा गरीब व गरजू लोकांसाठी मोफत लसीकरण कार्यक्रम …

 रिलायंस फाउंडेशनचा गरीब व गरजू  लोकांसाठी मोफत लसीकरण कार्यक्रम …


संपूर्ण जग कोरोना महामारी च्या विळख्यात सापडले आहे यापासून बचाव होण्यासाठी केंद्र शासनाकडून लसीकरण करून घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे शासनाकडून मोफत लसीकरण केले जात आहे तसेच काही खासगी रुग्णालयातही पैसे देऊन लसीकरण केले जात आहे. परंतु आजही झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मोलमजुरी करणारे लोक स्थलांतरित कामगार आणि हे लोक आपले दररोजचे काम करत असताना त्यांना लस उपलब्ध होणे कठीण होत आहे . त्यामुळे या सर्वांचा विचार करून रिलायन्स त्यांनी कोल्हापूर मधील गरजू गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना मोफत लसीकरण मोहीम सुरू केली आहे . रिलायन्स  फाउंडेशन हे काम पूर्ण देश पातळीवर ती राबवत आहे या देशातील गरजू गरीब सर्वसामान्य कुटुंबात ना मोफत लसीकरण करण्याचे काम रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून देश पातळीवरती We Care रिलायन्स फौंडेशन अंतर्गत सुरू  सुरू आहे.

रिलायंस फाउंडेशनचा गरीब व गरजू लोकांसाठी मोफत लसीकरण कार्यक्रम …

               कोल्हापूर शहरातील झोपडपट्टी तसेच एमायडिसी मधील स्थलांतरित कामगार तसेच भाजीविक्रेते रिक्षावाले आणि जे लोक सतत लोकांच्या संपर्कात असतात अशा लोकांचे मोफत लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शहरांमधील एकूण साडेतीनशे लोकांचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे रिलायन्स फाउंडेशन कडून मोफत उपलब्ध करून दिली जात आहे याचे लसीकरण सनराइज् हॉस्पिटल शिवाजी पार्क कोल्हापूर येथे सर्व नियमावलीनुसार व  कोविडचे नियम पाळून दिली जात आहे या मोहिमेसाठी शहरातील गोरगरीब जनतेचा सहभाग मोलाचा ठरत आहे शहरातील राजेंद्र नगर विचारे माळ काना नगर संभाजी नगर साने गुरुजी वसाहत सुतार माळ कुंभार गल्ली शाहूपुरी येथील गरजू लोकांनी या मोफत लसीकरण याचा लाभ घेतला आहे यासाठी सावित्रीच्या लेकी महिला विकास संस्था लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवून त्यांचे कोविन ॲप वरती रजिस्ट्रेशन करून घेऊन त्यांना केंद्रापर्यंत येण्यासाठी मार्गदर्शन केले.

रिलायंस फाउंडेशनचा गरीब व गरजू लोकांसाठी मोफत लसीकरण कार्यक्रम
 रिलायंस फाउंडेशनचा गरीब व गरजू लोकांसाठी मोफत लसीकरण कार्यक्रम

रिलायन्स फाऊंडेशन नि आतापर्यंत एकूण साडेतीनशे लोकांना मोफत लसीकरणाचा लाभ दिला आहे तरी जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब व गरजू कुटुंबातील व्यक्तींनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दीपक केकान , राज्य व्यवस्थापक,रिलायन्स फाऊंडेशन मारुती खडके,  जिल्हा व्यवस्थापक, रिलायन्स फाउंडेशन, नवनाथ माने, कार्यक्रम सहायक, रिलायन्स फाऊंडेशन  यांनी केले आहे.  रिलायन्स फाउंडेशनच्या या मोफत लसीकरण कार्यक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.





 "रिलायंस फाउंडेशनचा गरीब व गरजू लोकांसाठी मोफत लसीकरण कार्यक्रम"






















Post a Comment

आपणांस माहिती आवडल्यास नक्की कळवा तसेच तुम्हाला यासारखी कोणती माहिती हवी आहे ते “comment Box” मध्ये नक्की कळवा धन्यवाद...!

Previous Post Next Post